राज्यात 10 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त

राज्यात मागील चोवीस तासात 23 हजार 644 कोरोना रुग्ण घरी होऊन गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 10 लाख 450 झाली आहे. दरम्यान राज्यात आज 20 हजार 419 नवीन रुग्णांचे निदान झाले.

राज्यात आज सलग दुसऱया दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नविन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 76.94 इतका झाला आहे ही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन  दिली. राज्यात सध्याच्या घडीला 2 लाख 69 हजार 119 रुग्ण ऑक्टिव्ह आहेत. राज्यात दिवसभरात 430 करोना रुग्णांचा मृत्यु झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.66 टक्के एवढा आहे.

मुंबईत कोरोनाचे 2282 नवे रुग्ण; 44 जणांचा मृत्यू

मुंबईत कोरोना रुग्णवाढ कायम असून गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2282 नवे कोरोनाबाधित नोंद झाले असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसांत 1942 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत नोंद झालेल्या नव्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 196459 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 8747 झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या 1 लाख 58 हजार 749 झाली आहे. मुंबईत आता कोरोनाचे 28 हजार 568 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

चोवीस तासांत 85 हजार 362 नवीन रुग्णांची भर

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 59 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात गेल्या चोवीस तासात 85 हजार 362 नवीन रुग्णांची भर पडली असून 1 हजार 89 मृत्य़ू झाला आहे.त्यामुळे एपूण कोरोना रुग्णांची संख्या 59 लाख 3 हजार 933 पोहचली आहे. यात 9 लाख 60 हजार 969 ऑक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे जवळपास 48 लाख 49 हजार 585 रूगांनी कोरोनावर मात केली आहे. तर 93 हजार 379 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, इंडियन का@न्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानूसार 25 सप्टेंबरपर्यंत 7 कोटी 2 लाख 69 हजार 975 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी शुक्रवारी 13 लाख 41 हजार 535 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या