एक कोटीहून अधिक परप्रांतीय मजूर चालत घरी पोहोचले

कोरोना महामारीच्या काळात श्रमिक मजुरांनी मोठय़ा प्रमाणात स्थंलातर केले. या लॉकडाऊनच्या काळात देशभरातून तब्बल 1 कोटी 6 लाख मजूर हे चालत आपल्या घरी गेल्याची माहिती केंद्रीय रस्ते, परिवहन, महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी आज लोकसभेत दिली. या काळात एकूण 81 हजार 385 अपघात झाले असून त्यात 29 हजार 415 जणांचा मृत्यू झाले पण त्यात परप्रांतीय मजूर किती याची माहिती मात्र मंत्रालयाकडे नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पायी घरी जाणाऱया मजूरांसाठी सरकारतर्फे विविध सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या मजूरांसाठी वाहतूकीची व्यवस्था करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या