यंदा बारावीत 1 लाख 2 हजार 552 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बारावीचे 1 लाख 2 हजार 552 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यातील 34 हजार 543 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. त्याखालोखाल पुणे 18 हजार 132, संभाजीनगर 10 हजार 368, अमरावती 9 हजार 843, नाशिक 7 हजार 621, कोल्हापूर 7 हजार 330, नागपूर 6 हजार 901, लातूर 5 हजार 762 आणि कोकणातील 2 हजार 52 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाली आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल 2.53 टक्क्यांनी घसरला आहे. राज्याचा बारावीचा एकूण निकाल 85.88 टक्के इतका लागला आहे. गतवर्षी निकालाची टक्केवारी 88.41 इतकी होती. कोकण विभागातील सर्वाधिक 93.23 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात कोकणने आघाडी घेतली असली तरी गतवर्षीपेक्षा कोकणच्या निकालातही 1.62 टक्क्यांची घट झाली आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 82.51 टक्के इतका लागला असून सर्वाधिक 5.06 टक्क्यांची घट नागपूरच्या निकालात झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी मंगळवारी जाहीर केला.84.16, नंदुरबार – 83.82 व धुळे – 83.52 अशी टक्केवारी आहे.

नाशिक विभागाचा निकाल 84.77 टक्के

नाशिक विभागाचा यावर्षीचा निकाल 84.77 टक्के लागला असून, राज्यातील नऊ विभागांच्या यादीत नाशिक सातव्या क्रमांकावर आहे. नाशिक विभागात जळगाव जिह्याचा निकाल सर्वाधिक 86.61 टक्के आहे. त्यापाठोपाठ नाशिक

सलग तिसर्‍या वर्षी घसरण

सन 2017 ला नाशिक विभागाचा निकाल 88.22 व 2018ला 86.13 टक्के होता. यंदा सलग तिसर्‍या वर्षी निकालात घसरण झाली. मागील वर्षीच्या तुलनेत 1.36 ने घट दिसून आली. यंदाचा निकाल 84.77 टक्के आहे.

मुलींची आघाडी कायम

यावर्षीही मुलांच्या तुलनेत मुलींनी टक्केवारीत बाजी मारली आहे. विभागात 69 हजार 698 पैकी 61 हजार 99 (87.78 टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

विज्ञान शाखा अव्वल

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाखानिहाय निकालाच्या टक्केवारीत विज्ञान शाखेने आघाडी घेतली. विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल 94.02, वाणिज्य- 90.64, व्होकेशनल- 75.28 आणि कला- 73.74 टक्के आहे.

सोलापूर जिल्ह्याची आघाडी

सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 88.19 टक्के निकाल लागला आहे. किभागात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.88 आहे.