
सामना प्रतिनिधी, मुंबई
कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 60 स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडीदरम्यान या स्पेशल गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. यापूर्वी मध्य रेल्वेने 14 मार्च रोजी 52 उन्हाळी फेऱया सोडण्यात आल्या होत्या त्यामुळे मध्य रेल्वेने उन्हाळय़ासाठी सोडलेल्या एकूण फेऱयांची संख्या 112 इतकी झाली आहे. या गाडय़ांना वैभववाडीलाही थांबा देण्यात आला आहे. 23 मार्चपासून या गाडय़ांचे बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून करता येणार आहे.
पुणे-सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल ट्रेन
ट्रेन क्र.01411 – ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन 5 एप्रिल ते 7 जूनदरम्यान दर शुक्रवारी पहाटे 4.55 वा. पुण्याहून सुटून त्याच दिवसी रा. 8 वा. सावंतवाडीला पोहचेल.
ट्रेन क्र. 01412 – ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 7 एप्रिल ते 9 जूनदरम्यान दर रविवारी रात्री 8.30 वा. सावंतवाडीहून सुटून पुण्याला दुसऱया दिवशी दु. 12.25 वा. पोहचेल.
थांबे – लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
पनवेल ते सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल
n ट्रेन क्र. 01413 – ही स्पेशल ट्रेन 6 एप्रिल ते 9 जूनदरम्यान आठवडय़ातून दोन वेळा (20 फेऱया) शनिवारी, रविवारी स. 8.15 वा.पनवेलहून सुटून त्याच दिवशी रा. 8 वा. सावंतवाडीला पोहोचेल.
ट्रेन क्र. 01414 – ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 5 एप्रिल ते 8 जूनदरम्यान आठवडय़ातून दोन वेळा शुक्रवार, शनिवारी रात्री 8.30 वा. सावंतवाडीहून सुटून दुसऱया दिवशी स.7.20वा. पनवेलला पोहचेल.
थांबे – रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.


























































