
सामना प्रतिनिधी । नगर
मोटारसायकल चेसिंग नंबर व इंजिन नंबर वरुन मोटर सायकल चोरी करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अजुनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोपीमध्ये इमरान यासीन शेख, रोहीत भारत औसरमल यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून विना क्रमांकाचे काळ्या रंगाचे स्पलेंडर मोटर सायकलवरुन राहूरी बाजूकडून आले व एमआयडसी येथील शेंडी बायपास चौकाजवळ रस्त्याचे कडेला मोटार सायकल उभी करुन कोणाची तरी वाट पहात थांबेले. पथकातील कर्मचारी यांची खात्री झाल्याने घेराव घालून त्यांनी आरोपीमध्ये इमरान यासीन शेख, रोहीत भारत औसरमल यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता यासीन याने मोटारसायकल स्वतःची असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील सदर मोटारसायकलचे कागदपत्राबाबत विचारपुस केली असता त्यांनी ही मोटारसायकल शिरुर जिल्हा पुणे येथून घेतल्याचे सांगितले.
पोलिसांनी खातरजमा केली असता सदर मोटार सायकलचा क्रमांक एमए-12 केएफ 5429 असा असून मोटार सायकल चोरी बाबत फिर्यादी शैलसे रमेश साळवे यांनी दि.14 नोव्हेंबर 2018 रोजी दिली होती. यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शोखचे पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, रणजित जाधव, अशोक गुंजाळ, बेरड यांनी मिळून केली.


























































