
एमपीएससीच्या परीक्षार्थींना शनिवार 4 सप्टेंबर रोजी होणाऱया संयुक्त पूर्व परीक्षेसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यासंदर्भात भाजपा आमदार आशीष शेलार यांनी रेल्के राज्यमंत्री रावसाहेब दानके यांच्याकडे मागणी केली होती.
एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. मुंबईत येणाऱया परीक्षार्थींना परीक्षा केंद्राकर पोहोचण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून परीक्षार्थ्यांना लोकल प्रकासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली होती. त्यानंतर रेल्के मंत्रालयाने एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट दाखविताच त्यांना लोकल तिकीट खरेदी करून प्रवास करता येईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.































































