
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून सलग सहाव्या वर्षी कोणताही पगार घेतला नाही; परंतु त्यांनी डिव्हिडंडमधून तब्बल 3 हजार 996 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
कंपनीने जारी केलेल्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मुकेश अंबानी यांचा पगार, भत्ते, अलाउन्स आणि सेवानिवृत्तीचे फायदे पूर्णपणे शून्य राहिले आहेत. जून 2020 मध्ये कोरोना काळात त्यांनी आपले पूर्ण वेतन सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत चेअरमन आणि सीएमडी म्हणून कोणतेही वेतन घेतले नाही.






























































