
सामना ऑनलाईन । लखनौ
समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांची संपत्ती तीन कोटींनी घटली आहे. त्यांच्याकडे एकही कार नसून त्यांचा मुलगा आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे कर्जही त्यांच्यावर असल्याचे निकडणूक आयोगाकडे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून मुलायमसिंह यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मुलायमसिंह यांनी मालमत्तेची माहिती दिली. मुलायमसिंह यांनी त्यांच्याकडे 16 कोटी 52 लाख 44 हजार 300 रुपये स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. 2014 च्या तुलनेत मुलायमसिंह यांच्या संपत्तीत 3 कोटी 20 लाख 15 हजार 517 रुपयांनी घट झाली आहे. 2014 मध्ये त्यांनी 19 कोटी 72 लाख 59 हजार 817 रुपये स्थावर व जंगम मालमत्ता दाखविली होती.




























































