अखेर ‘तीरा’ला इंजेक्शन मिळाले

एसएमए टाइप-1 या दुर्धर आजारातून बाहेर काढण्यासाठी अखेर तीरा कामत या चिमुकलीला आज इंजेक्शन देण्यात आले. तीरावर उपचारासाठी 16 कोटी रुपयांचे हे इंजेक्शन अमेरिकेतून मागवण्यात आले होते. आज हिंदुजा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तीराला ते देण्यात आले.

तीराला जडलेल्या आजारावर हिंदुस्थानात अद्याप औषध किंवा इंजेक्शन उपलब्ध नाही. अमेरिकेमध्ये ते उपलब्ध आहे पण तिथे नेऊन तीरावर उपचार करणे तिचे पालक मिहिर आणि प्रियांका कामत यांना शक्य नव्हते. अखेर ते हिंदुस्थानातच मागवण्याचा निर्णय घेतला गेला. इंजेक्शनसाठी 16 कोटी इतकी मोठी रक्कम त्यांनी क्राऊड फंडिंगद्वारे उभी केली.

इंजेक्शनची रक्कम उभी झाली तरी इंजेक्शन हिंदुस्थानात आणण्यासाठी लागणारे विविध कर मिळून सहा कोटी रुपये अतिरिक्त खर्च येणार होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि पेंद्र सरकारने कर आणि जीएसटी माफ केली. कामत पुटुंबीयांना याकामी अभिनेता नीलेश दिवेकर यांनी मदत केली होती. एसएमए टाइप-1 या आजारावर उपचारासाठी देशात आतापर्यंत 11 चिमुकल्यांना असे इंजेक्शन देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या