‘मी पण चौकीदार’ म्हणणारे वकील अडचणीत येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मी पण चौकीदार’ या मोहिमेमुळे वकील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वकिली व्यवसायात असताना अन्य व्यवसायाचा उल्लेख वकील करू शकत नाही असा दावा करत या मोहिमेत सहभागी झालेल्या वकिलांविरोधात मुंबईतील एका वकिलाने बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली आहे.

ऍड. एजाज नक्वी यांनी याबाबत तक्रार नोंदवली असून यासंदर्भात त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाला आठ पानी पत्र पाठवले आहे. नियमानुसार कोणत्याही वकिलाला वकिली क्षेत्रात असताना अन्य व्यवसाय किंवा नोकरी करता येत नाही, परंतु अनेक वकिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मी पण चौकीदार’ या मोहिमेत सहभागी होऊन सोशल मीडियावरील नावाच्या आधी ‘चौकीदार’ असे लिहिले आहे. त्यामुळे बार कौन्सिलच्या नियमाचा भंग झाला असून सार्वजनिक क्षेत्रात वकिली व्यवसायाबाबत दिशाभूल निर्माण होत आहे असा दावा या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तसेच सध्या राजकीय क्षेत्रात वावरणाऱया वकिलांचा उल्लेखही करण्यात आला आहे.