मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे टेंडर उघडले; एल अॅण्ड टी, टाटा प्रोजेक्टसह सात कंपन्या उत्सुक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या डिझाईन आणि बांधकामासंबंधित तांत्रिक निविदांना बुधवारी उघडण्यात आले असून त्यास सात महत्वाच्या कन्स्ट्रक्शन इन्प्रâास्ट्रक्चर कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पाेरेशन लिमिटेडने (एनएचआरसीएल) आज 23 सप्टेंबर रोजी निविदा उघडल्या. या निविदा प्रक्रियेत प्रमुख तीन बोलीदारांसह एकूण सात महत्वाच्या पायाभूत कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यात दि अॅफकॉन्स-इरकॉन कॉन्सॉर्टीयम, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि दि एनसीसी-टाटा प्रोजेक्ट हे तीन निविदाकार यात सहभागी झाले होते. तब्बल 1.08 लाख कोटी रूपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या गुजरातच्या हद्दीतील वापी आणि वडोदरा दरम्यानच्या 237 कि.मी. मार्गाच्या बांधकामाचे टेंडर उघडण्यात आले असून एकूण 508 कि.मी. मार्गापैकी ते 47 टक्के इतके आहे. गुजरात येथील 83 टक्के जमीनीचे संपादन पूर्ण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे बुलेट ट्रेनचे बांधकाम रखडले असून प्रकल्पाची 2023 ही डेडलाईन टळणार असल्याचे वृत्त आधी आले होते.

90 हजार रोजगार तयार होणार
या प्रकल्पाच्या बांधकामामुळे थेट आणि अप्रत्यक्ष असे 90 हजार रोजगार तयार होणार असल्याचे एनएचआरसीएलने म्हटले आहे. केंद्र सरकारने आणखी सात मार्गांवर बुलेट ट्रेन चालविण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्यात दिल्ली ते अहमदाबाद, दिल्ली ते अमृतसर, दिल्ली ते वाराणसी, चेन्नई ते म्हैसूर, वाराणसी ते हावडा, मुंबई ते हैदराबाद आणि मुंबई ते नागपूर या मार्गांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या