
अंधेरी येथे बेस्टच्या बसचा विचित्र अपघात झाला. बसने तब्बल 14 वाहनांना धडक दिली. अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. दोघा जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
242 क्रमांकाची ही बस सीझर रोडवरून उजवीकडे वळत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. बसने चार खासगी कार आणि एका तीनचाकी टेम्पोला धडक दिली. या अपघातात शांतालाल यादव (33) व साक्षी (33) हे दोघे जखमी झाले. या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर अपघातग्रस्त बस टोइंगद्वारे अंधेरी पश्चिम बसस्थानकात हलविण्यात आली.
























































