
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तरुणांचा वाढता कल असून भांडूपमधील तरुणांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. विभागप्रमुख आमदार रमेश कोरगावकर व आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा जाहीर प्रकेश करण्यात आला.
कांजुर-भांडूप येथील तरुण विशाल दिलीप मेंढे, स्वप्नील गोपाल जोईल, मयुर चव्हाण, तुषार चाळके, आनंद पेडणेकर, विशाल जाधव यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक उपेंद्र सावंत तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



























































