मुंबई बनली बिलेनिअर सिटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैभवसंपन्न मुंबईच्या शिरपेचात आता आणखीन एक तुरा रोवण्यात आला आहे. जगातील बिलेनियर्स सिटीच्या यादीत हिंदुस्थानातील एकमेव अशा मायानगरी मुंबईने झेंडा रोवला आहे. ‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या देशभरातील बिलेनियर्स सिटीच्या यादीत मुंबईने यंदा आठव्या क्रमाकांवर मजल मारली आहे. एकूण 48 बिलेनियर्ससह मुंबईने ही झेप मारली आहे. मुंबईतील या 48 बिलेनियर्समध्ये देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे अग्रस्थानावर आहेत. त्यांच्या नावे एकूण 6.1 लाख कोटी संपत्ती असल्याची नोंद करण्यात आली आहे. ‘पर्ह्ब्स’ने जाहीर केलेल्या या यादीत बीजिंगमध्ये सर्वाधिक बिलेनियर्स राहत असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

‘फोर्ब्स’ने नुकतीच जगभरातील कोणकोणत्या शहरात किती बिलेनियर्स राहतात याची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार देशातील पहिल्या दहा सिटीमध्ये आशिया खंडातील एकूण 6 शहरांचा समावेश आहे. ज्यात हिंदुस्थानातील एकमेव मुंबईचा समावेश आहे. उर्वरित चार शहरांमध्ये 2 अमेरिकेतील तर 2 युरोपमधील शहरांचा समावेश आहे. ‘पर्ह्ब्स’ने जाहीर केल्यानुसार जगभरात एकूण 2 हजार 755 बिलेनियर्स राहतात. त्यातील 42 टक्के बिलेनियर्स हे आशिया खंडात राहतात.
कोण ठरतात बिलेनियर्स

‘फोर्ब्स’ने दिलेल्या आकडेवारीनुसार ज्यांची संपत्ती एक अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. म्हणजेच हिंदुस्थानी चलनानुसार ज्यांची संपत्ती 7 हजार 350 कोटी इतकी आहेत ते बिलेनियर्स म्हणून ओळखले जातात.

मुंबईत वाढले 10 बिलेनियर्स
z हिंदुस्थानातील एकमेव अशा मुंबईचा या यादीत समावेश करण्यात आला असून मुंबई आठव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी मुंबईत 10 बिलेनियर्स वाढले असून मुंबईतील बिलेनियर्सची एकूण मालमत्ता 19.5 लाख करोड असल्याची नोंद यावेळी करण्यात आली आहे.
z अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर बिलेनियर्स शहरांच्या यादीत दुसऱया स्थानावर असून त्या ठिकाणी एकूण 99 बिलेनियर्स राहतात. न्यूयॉर्क येथील मायकल ब्लूमबर्ग हे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती 4.3 लाख करोड इतकी आहे.
z हाँगकाँगमध्ये राहत असलेल्या एकूण 80 बिलेनियर्सकडे एकूण 33 लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे या यादीतून समोर आले आहे. तर ली का शिंग येथील सर्वात मोठे बिलेनियर्स आहेत.
z तर सातव्या क्रमांकावर असलेल्या लंडनमध्ये गेल्या वर्षी एकूण 7 बिलेनियर्सची भर पडली आहे. या ठिकाणी एकूण 63 बिलेनियर्स राहत असून त्यांची संपत्ती एकूण 23 लाख कोटी इतकी आहे.

टॉप टेन एकूण
बिलेनयर्स शहर बिलेनियर्स
बीजिंग 100
न्यूयॉर्क 99
हाँगकाँग 80
मॉस्को 79
शेनजेन 68
शांघाई 64
ब्रिटन 63
मुंबई 48
सॅन फ्रान्सिस्को 48
हाँगझोऊ 47

48 श्रीमंतांसह फोर्ब्सच्या यादीत आठव्या स्थानावर, मुकेश अंबानी नंबर वन
फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे नाव सर्वात टॉपवर आहे. मुकेश अंबानी हे यादीतील प्रथम क्रमाकांचे बिलेनियर्स ठरले आहेत. त्यांच्या नावे एकूण 6.1 लाख कोटी संपत्ती असल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षात त्यांची संपत्ती दुप्पट झाली आहे. मुकेश अंबानी यांच्यापाठोपाठ दुसऱया स्थानावर चीनच्या हाँकझोऊ या शहरातील झांग शेनशान हे दुसरे बिलेनियर्स ठरले असून त्यांच्या नावे 5 लाख कोटींची संपत्ती आहे.