मुंबईत दिवसभरात 340 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-new

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 340 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 461 कोरोनाचे रुग्ण सापडले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 445 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 423 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 97 हजार 101वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे, तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 445 दिवसांवर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात 2,700 कोरोनामुक्त

राज्यात आज 2 हजार 700 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 3 हजार 663 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.