
संचारबंदी असतानाही केवळ उच्चभ्रू नशेबाजांसाठी एल एसडी पेपर आणि एमडीएम गोल्यांचा साठा विकण्यासाठी आलेल्या एका ड्रग्ज तस्कराला अमली पदार्थविरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने रंगेहाथ पकडले. त्या तस्कराकडून पोलिसांनी 17 लाख 30 हजार किमतीचा 173 एल एसडी पेपर, साडेपाच लाख किमतीच्या 37.5 ग्रॅम वजनाच्या 75 एँक्स्टँसी (एमडीएमए) गोल्या तसेच गुह्यात वापरेली जीप पॅम्पस गाडी जप्त केली आहे.
कांदिवली युनिटचे प्रभारी निरीक्षक रूपेश नाईक व त्यांचे पथक मालाड-मालवणी परिसरात बुधवारी गस्त घालत असताना एव्हरशाईन नगरात एक तरुण काळय़ा पिशवीसह त्याच्या जीप कॅम्पस गाडीसह उभा असल्याचे पोलिसांच्या नजरेस पडला. त्या वेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात 173 एलएसडी पेपर सापडले. त्यानंतर गाडी असलेल्या काळय़ा पिशवीची तपासणी केली असता त्यात 37.5 ग्रॅम वजनाच्या 75 एँक्स्टँसी गोळय़ा मिळून आल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
इंन्स्टाग्रामवर ड्रग्जचा व्यवहार
मोनीश शिक्षित तरुण असून तो इंन्स्टाग्रामवर ड्रग्जचा व्यवहार करत होता. तो या माध्यमातून पाहिजे त्या ड्रग्जची मागणी करायचा आणि ऑनलाईन पेमेंट करायचा. 2017पासून मोनीश ड्रग्जच्या धंद्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली असून पोलीस निरीक्षक रूपेश नाईक व त्यांचे पथक अधिक तपास करीत आहेत.



























































