एका महिन्यात 85 ड्रग्ज तस्कर गजाआड, कोटय़वधीचा ड्रग्ज साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमली पदार्थविरोधी कक्षाने ड्रग्ज माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. अवघ्या एका महिन्यात पोलिसांनी 85 ड्रग्ज तस्करांना बेडय़ा ठोकून कोटय़वधी किमतीचा ड्रग्ज साठा जप्त केला.

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या युनीट्सने मार्च महिन्यात शहरातील विविध ठिकाणी ड्रग्जविरोधात मोठय़ा कारवाया केल्या. 67 गुन्हे दाखल करून 85 ड्रग्ज तस्करांना अटक केली. तर त्या तस्करांकडून 26 लाख 11 हजार किमतीचा व 95 किलो 832 ग्रॅम गांजा, तीन ग्रॅम हेरोईन, दोन कोटी 97 लाख 93 हजार किमतीचा नऊ किलो 660 ग्रॅम चरस, नऊ कोटी 72 लाख 72 हजार किमतीचा सहा किलो 659 ग्रॅम मेफेड्रोन आणि सात लाख 34 हजार किमतीचा अन्य ड्रग्जचा साठा जप्त केला.