एचएसबीसी बँकेची डबेवाल्यांना 15 कोटींची मदत, नव्याकोऱया सायकलला पुन्हा डबा लटकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फटका मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करणाऱया डबेवाल्यांनाही बसला आहे. मार्च 2020 पासून त्यांची सेवा बंद आहे. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे रोजगार बंद अशा दुहेरी संकटात सापडलेल्या डबेवाल्यांच्या मदतीला आता एचएसबीसी बँक सरसावली असून डबेवाल्यांना 15 कोटींची मदत आज जाहीर केली.

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलही बंद ठेवण्यात आली. याचा फटका 130 वर्षांपासून डबे पोहचवण्याचे काम करणाऱया डबेवाल्यांना बसला आले. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘एचएसबीसी’ने पुढाकार घेतला आहे.

डबेवाल्यांना अन्नधान्य, विमा, मुलांचे शिक्षण तसेच लॉकडाऊननंतर पुन्हा भरारी घेण्यासाठी नवीन सायकली या 15 कोटींतून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी एचएसबीसी बँक ‘युनायटेड वे मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत डबेवाल्यांना मदत पोहचवणार आहे, अशी माहिती बँकेचे अंतरिम मुख्य अधिकारी हितेंद्र दवे यांनी दिली. बँकेच्या या घोषणेमुळे मुंबईतील दोन लाख डबेवाल्यांना याचा लाभ होणार आहे.