
सामना ऑनलाईन। मुंबई
बॉलिवूडचे क्यूट कपल दीपिका पदुकोण व रणवीर सिंह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या घरात लगीनघाईची गडबड सुरू आहे. दीपिकाच्या बंगळुरू येथील घरी लग्नाआधीचे विधीही सुरू झाले आहेत. तर रणवीरही हळद लावून तयार झाला आहे. याचदरम्यान दिपिकाने एक हटके मंगळसूत्र बनवल्याची माहिती हाती येत आहे. हे हिरेजडीत मंगळसूत्र असून त्याची किंमत २० लाख रुपये आहे. मुंबईतील एका नामांकीत ज्लेलर्सकडून तिने हे मंगळसूत्र बनवून घेतलं आहे.
या मंगळसूत्रात सॉलिटेयर नावाचे हीरे जडवण्यात आले आहेत. मंगळसूत्रांबरोबर दोन हिरेजडीत हारही दीपिकाने खरेदी केले आहेत. आतापर्यंत लग्नाच्या दागिन्यांवर दिपिकाने तब्बल १ कोटी रुपये खर्च केले आहेत. रणवीरसाठीही तिने सोन्याची चेन बनवली आहे. सध्या दीपिका- रणवीर आपआपल्या घरी असून त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधीला सुरूवातही झाली आहे. दीपिकाच्या घरी नुकतीच नंदी पूजन करण्यात आलं. तर रणवीरलाही हळद लावण्यात आली आहे. या दोघांच्या या विधीचे फोटो सोशल साईटवर व्हायरल झाले आहेत. या महिन्यात 14-15 नोव्हेंबरला दीपिका रणवीर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. इटलीतील एका राजमहालात हा शाही लग्नसोहळा संपन्न होणार आहे.



























































