डॉक्टरांचे कवी संमेलन

नरसिंह के.दुबे चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातर्फे नुकतेच डॉक्टरांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात वसई, विरार आणि नालासोपारामधील अनेक डॉक्टरांनी उपस्थिती दर्शविली होती. या कवी संमेलनाचे अध्यक्षपद संस्थेचे विश्वस्त आणि स्त्री रोग प्रसुतितंत्र विभाग प्रमुख डॉ. ऋतुजा दुबे यांनी केले. यावेळी नालासोपरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मांजलकर, डॉ. तुषार मसुरकर, डॉ. सुरेश पाटील, डॉ. रोहिणी पाटील, डॉ. सुरेखा धनावडे, डॉ. रेणुका पाटील, डॉ. अर्पणा निजाई, डॉ. मोना त्रिवेदी, डॉ. सेलिन डिमॉण्टी, डॉ. श्रीकांत सिंह, डॉ. श्रीराम दहातोंडे, डॉ. मोहित पंडित, डॉ. स्वाती भिंगारे आदींनी कवितांचे सादरीकरण केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या