अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेची कारवाई योग्यच! कंगनाला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश

mumbai-highcourt

अनधिकृत बांधकामप्रकरणी कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्यावर करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला. तसा पुरवणी अर्ज पालिकेने न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सादर केला. यावर हायकोर्टाने कंगनाला सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्याचे आदेश दिले

कंगनाने वांद्रे येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केले असून पालिकेने 9 सप्टेंबर रोजी हे बांधकाम जमीनदोस्त केले.  नोटीस बजावून 24 तासाच्या आतच पालिकेने कारवाई केल्यामुळे आकसापोटी हे बांधकाम तोडल्याचा आरोप करत नुकसान भरपाई म्हणून पालिकेने 2 कोटी देण्याची मागणी कंगनाने हायकोर्टात केली आहे. कंगनाने बंगल्याच्या तळ मजल्यावर फेरफार केले असून तसे फोटोही पालिकेच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अस्पि चिनॉय आणि ऍड. जोएल कार्लेस यांनी खंडपीठासमोर सादर केले. कंगनाने घराच्या मार्गात बदल केल्याचे पालिकेने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर हे बांधकाम सुरू असताना तोडले की ते त्यानंतर तोडले जर ते बांधकाम अगोदर केले असेल तर पालिकेने त्याकर आता कारवाई केलीच कशी असे कोर्टाने पालिकेला विचारले.

खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, कंगनाला खुलाशासाठी मुदतवाढ नाही! 

अभिनेत्री कंगना राणावतला खारमधील घरात केलेल्या अनधिकृत बांधकामावरील खुलाशासाठी तीन आठवडय़ांपेक्षा जास्त मुदतवाढ देता येणार नाही, असे दिंडोशी दिवाणी न्यायालयाने आज स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या