पालिका बजेटसाठी मुंबईकरांसाठी आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी मुंबईकरांनी 28 जानेवारीपर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठवाव्यात, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबईकरांनी आपल्या सूचना bmcbudget. [email protected] या ई-मेलवर 28 जानेवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक 5 फेब्रुवारीपूर्वी सादर करण्यात येणार आहेत. ज्यांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी त्या 28 जानेवारीपर्यंत प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका मार्ग, पर्ह्ट, मुंबई – 400001 येथे पाठवाव्यात.