Mumbai News – नायर रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईतील नायर रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. डीनच्या अधिकृत ईमेलवर रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल आला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत तपासणी सुरू केली. दरम्यान, नायर रुग्णालय आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त गस्त आणि पाळत ठेवणारी युनिट्स तैनात करण्यात आली आहेत.

सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या कॅम्पसची तपासणी केली. प्रत्येक वॉर्ड, कॉरिडॉर आणि आजूबाजूच्या परिसरात तपासणी करण्यात आली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. डीनच्या अधिकृत ईमेलवर शनिवारी रात्री 11 वाजता हा धमकीचा मेल प्राप्त झाला. ईमेल कुणी पाठवला याबाबत सायबर पथके तपास करत आहेत. तसेच संशयितांची चौकशी करत आहेत.