पीएमसी बँकेचे 78 टक्के ठेवीदार सर्व रक्कम काढू शकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक अडचणीत आल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ठेवीदारांची आर्थिक कोंडी झाली असली तरी सध्या 50 हजार रुपये एवढी रक्कम काढण्यास ठेवीदारांना परवानगी दिली आहे. त्यामुळे एकूण ठेवीदारांच्या तब्बल 78 टक्के ठेवीदार आपल्या खात्यावरून सर्व रक्कम काढू शकतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

एचडीआयएल कंपनीला मोठय़ा प्रमाणात कर्ज दिल्याने पीएमसी बँक आर्थिक अडचणीत आली आहे. त्यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने 23 सप्टेबर रोजी निर्बंध आणत ठेवीदारांना खात्यावरून केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत आरबीआयने वेळोवेळी पैसे काढण्याची मर्यादा वाढवत 50 हजार रुपयांपर्यंत आणली आहे. तसेच घरातील लग्नकार्य, शिक्षणासह अन्य निवडीच्या गरजेसाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना काढता येत असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

प्रियंका गांधींच्या सुरक्षेत त्रुटी; अज्ञातांची घरात घुसखोरी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 25 नोब्हेंबर रोजी अज्ञातांनी सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट प्रियंका गांधी यांच्या घरात घुसखोरी करून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटवल्याने देशभरातून टीका होत असतानाच प्रियंका यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीतील लोधी इस्टेटमध्ये प्रियंका गांधी यांचे निवासस्थान आहे. त्यांची एसपीजी सुरक्षा हटवून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या घरातील या घुसखोरीबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.