
संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना वाहतूक काsंडीविना प्रवास करता यावा तसेच कोणीही विनाकारण गाडय़ा घेऊन फिरू नये यासाठी सात दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सुरू केलेली कलर कोड मोहीम अखेर रद्द करण्यात आली आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी गेल्या आठवडय़ात लाल, हिरवा, पिवळा अशा तीन रंगांत कलर कोड मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम आता बंद केली आहे. पण गाडय़ांची संपूर्ण तपासणी चालू राहील, असे स्पष्ट करतानाच जनतेच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
























































