मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाच्या हस्तांतरणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा! हायकोर्टाचे प्रतिवाद्यांना आदेश

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचे हस्तांतरण करून खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. याप्रकरणी हायकोर्टाने मुंबई पोर्ट ट्रस्ट, तेथील वैद्यकीय अधिकारी आणि झोडियाक हिलोट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांना जाब विचारत 15 दिवसांत प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौकानयन मंत्रालय आणि झोडियाक हिलोट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांमध्ये 3 ऑक्टोबर 2019 रोजी झालेल्या करारातील अटींचे पालन न करताच बेकायदेशीरपणे झोडियाक कंपनीला मुंबई पोर्ट ट्रस्टचे हॉस्पिटल  22 जुलै 2020 रोजी हस्तांतरण करण्याचा निर्णय पोर्ट ट्रस्टने घेतला. झोडियाक कंपनीने अटींचे पालन न करता हॉस्पिटलचा ताब्यात घेण्यास  सुरुवात केली. याविरोधात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन तसेच ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने 3 ऑक्टोबर 2019 रोजी झालेल्या करारातील अटींचे पालन केल्याशिवाय पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलचे हस्तांतरण केले जाणार नाही, तोपर्यंत झोडियाक कंपनीने हॉस्पिटलच्या परिसरात काम करण्यासाठी जाऊ नये असे आदेश दिले होते मात्र पोर्ट ट्रस्टने बेकायदेशीरपणे झोडियाक कंपनीला रुग्णालयाचे काम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे कामगारांनी हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या