पुण्याला निघालाय, मग ही बातमी वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

मुंबईहून पुण्याला जर तुम्ही निघाला असाल किंवा जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खालापूर टोलनाक्यावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळत आहे.

khalapur-toll-naka-traffic

शनिवार आणि रविवारची सुट्टी एंजॉय करण्यासाठी मुंबईतली अनेक मंडळी पुण्याला किंवा अॅडलॅब इमॅजिकाला जातात. आजही हीच परिस्थिती बघायला मिळाली. मात्र आज इतर शनिवारच्या तुलनेत जरा जास्तच गर्दी असल्याने आणि गर्दीतून बाहेर पडण्यासाठी वाहने पुढेपुढे घुसवण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.