मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्यात धडामधुम

1288
H

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा प्रवासाठी धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. बोगद्याच्या आतील काँक्रीट केलेला मोठा भाग बाजूपट्टीवर कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी या मार्गावरून वाहनांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या धडाम्धूममुळे बोगद्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ 2015 साली महाकाय दरड कोसळून सहा काहनांचे नुकसान व चार प्रवासी ठार झाले होते, तर सात ते दहा प्रकाशांना जखमा झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते.

रस्ते विकास महामंडळाने बोरघाटात दरडसदृश भागावर लोखंडी जाळी लावण्याचे काम केले होते. मात्र आता बोगद्याच्या आतील प्लास्टर खिळखिळे झाले असल्याने बाहेर दरडींचा तर आत बांधकाम कोसळण्याचा धोका कायम आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याला पावसाळ्यात दरडींचा धोका कायम असतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सतत विस्कळीत होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. मात्र आता बोगद्याचे आतील बांधकामही कमकुवत झाले असून त्याची पडझड सुरू झाली आहे. सोमवारी रात्रीही आडोशी बोगद्याच्या मार्गिकेमधील काँक्रीटचा मोठा थर कोसळला. मोठमोठे तुकडे मार्गिकेच्या बाजूपट्टीवर तसेच काही छोटे तुकडे मार्गिकेमध्ये पडले होते. बोगद्यात काहनांची गती कमी असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान आडोशी बोगद्यात काहीतरी पडले असल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पथकप्रमुख गुरुनाथ साठेलकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकाऱयांशी संपर्क साधला. त्यानंतर बोगद्यातील काँक्रीटचे थर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

स्ट्रक्चरल ऑडिट करणार

पावसाळ्यात आडोशी बोगद्याजकळ डोंगराचा काही भाग सैलसर झाला होता. त्या अनुषंगाने बोगद्याची अंतर्गत तपासणी तज्ञांकडून करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी तांत्रिक बाबी तपासून घेणार असून माडप बोगद्याचीही तपासणी करण्यात येईल. – ए. ई.सोनावणे, मुख्य कार्यकारी अभियंता.

आपली प्रतिक्रिया द्या