
सामना ऑनलाईन । मुंबई
पाच वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ला मिळालेल्या अभूतपूर्क यशानंतर आणि दोन वर्षांपूर्वी आलेल्या सिक्वेलच्या यशानंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. अशाप्रकारचा हा मराठीतील पहिलाच प्रयत्न असून अशाप्रकारचा मराठीतील हा पहिलाच ‘मुंबई पुणे मुंबई- 3’ चित्रपट वर्षाअखेर म्हणजेच 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटातील स्वप्नील जोशी क मुक्ता बर्वे यांच्या आयुष्यात पुढे काय घडते याची कल्पना हा टीजर बघून येते. चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया तर सहनिर्माते अमित भानुशाली आहेत.
चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई-2’ हा दोन वर्षांपूर्वी दिवाळीत झळकला होता. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिकासारख्या देशांमध्येही चित्रपटाला भरपूर प्रतिसाद लाभला. या चित्रपटाचे शो सॅन फ्रान्सिस्को, ह्युस्टन, लॉस एंजेलिस, डेट्रॉइट, सॉल्ट लेक सिटी या देशांतही झाले हेते.
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, ‘मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक केगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या घोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसर्या भागाचे चित्रीकरण करत असताना तिसरा भाग करता येईल, हे स्पष्ट जाणवले.



























































