सुपर 30 वर हृतिकच्या आईचा वर्कआऊट डान्स पाहिलात का?

48
hrithik-roshan-mother

सामना ऑनलाईन। मुंबई

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर सक्रिय असून तो फिटनेसच्या बाबतीतही तो जागरुक असतो. फिटनेसचे हे बाळकडू त्याला आईकडून मिळाल्याचे सांगणारा एक व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हृतिकच्या सुपर 30 या चित्रपटातील गाण्यावर त्याची आई पिंकी रोशन या वर्कआऊट करत असल्याचे यात दिसत आहे. हृतिकनेच हा व्हिडीओ त्याच्या टि्वटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

व्हिडीओखाली हृतिकने आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुपर मॉम, लव्ह यू मॉम, असे त्याने म्हटले असून तुझ्यावर गर्व आहे. असे देखील त्याने म्हटले आहे. ऋतिकच्या सुपर 30 या चित्रपटाने सर्वत्र धूम उडवली असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 100 कोटींच्या घरात पोहचला आहे. यातील हृतिकचा अभिनय प्रेक्षकांना भावला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच चित्रपटातील गाण्यावर त्याच्या आईने वर्कआऊट केले आहे.


View this post on Instagram

Wait for it… #championoflife #supermom #loveyoumama #truelove ❤️

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

आपली प्रतिक्रिया द्या