शिवसेना-भाजप पक्षांमधील समन्वयाकरिता पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-shivsena

सामना प्रतिनिधी। मुंबई

लोकसभा निवडणूक जाहीर झालेली असून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे जागावाटपही झालेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार निवडणुकीच्या कालावधीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.

लोकसभा मतदारसंघ    शिवसेना भाजप
सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड, मावळ (रायगडमधील तीन विधानसभा) सुभाष देसाई

शिवसेना नेते

रवींद्र चव्हाण
कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी एकनाथ शिंदे

शिवसेना नेते

रवींद्र चव्हाण
पुणे, बारामती, शिरूर, सोलापूर, माढा, मावळ (रायगडमधील तीन विधानसभा वगळून) डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसेना उपनेत्या

गिरीश बापट
सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले नितीन बानुगडे-पाटील

शिवसेना उपनेते

चंद्रकांत पाटील
नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी दादा भुसे गिरीश महाजन
हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव अर्जुन खोतकर पंकजा मुंडे
बुलढाणा,अकोला, वाशीम-यवतमाळ,वर्धा,अमरावती, नागपूर,भंडारा-गोंदिया, गडचिरोली,चिमूर, चंद्रपूर, रामटेक डॉ. दीपक सावंत चंद्रशेखर बावनकुळे