
‘हिरकणी’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आगामी ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. ट्रेलरवरून सिनेमाची उत्सुकता वाढलीय.
सिनेमातील भूमिकेबाबत ती म्हणाली, माझी भूमिका विक्की या नावाची आहे. जी कॉमिक्स बुकआर्टिस्ट आहे, ती कॉमिक्स लिहिते, कॅरेक्टर डिझाईन करते. तिला या जगात राहायला रमायला आवडते. खऱया आयुष्यात ती तिच्या बाबांचा बिझनेस चालवते. ती फार यशस्वी ठरत नाही. एक सर्वसामान्य मुलगी एका असामान्य परिस्थितीमध्ये अडकते ती त्यातून बाहेर पडते का अशी ही जर्नी आहे. या रहस्यपटाच्या ट्रेलरमध्ये एक मास्क मॅनदेखील दिसत आहे. याबाबत आताच काही बोलण्यास सोनालीने नकार दिला आहे. सोनालीसोबत स्पृहादेखील यात झळकणार आहे. मी आणि स्पृहाने सेटवर खूप धम्माल केली. आमचे स्वभाव खूप सारखे आहेत. ती कविता करते, खूप संवेदनशील आहे. त्यामुळे ही मैत्री कायम टिकणार असल्याचे तिने सांगितले. ‘हिरकणी’ सिनेमामुळे प्रेक्षकांकडून माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत. याबद्दल तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. वेबसीरिजबाबत ती म्हणाली, मला वेबसीरिज करायला आवडतील, पण उगाच काहीतरी विशेष बोल्ड वैगरे आहे असे करण्यात मला इंटरेस्ट नाही. मी त्यात कंफर्टेबल नाही. उत्तम रोल आणि उत्तम प्रोडक्शन, उत्तम स्क्रिप्ट मिळाली तरच मला नक्कीच वेबसीरिजमध्ये काम करेन.




























































