मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे अनेक परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले असताना मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. उद्या 15 एप्रिलपासून महाविद्यालस्तरावरील सेमिस्टर-2 व 4 ची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.

विद्यापीठातील विविध सेमिस्टरचा परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना कोणताही धोका होणार नाही. यामुळे या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे. राज्यात कोरोना संसर्गामुळे 1 मेपर्यंत संचारबंदी आणि कडक निर्बंध जारी केले आहेत. मात्र परीक्षा आणि इतर कामकाज लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठातील परीक्षा आणि इतर कामकाजासाठी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी यांची 50 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठीचे परिपत्रक विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून जारी करण्यात आले आहे.