हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठा आरक्षण, दुष्काळ, मराठा-धनगर आरक्षण आणि विधानसभा उपाध्यक्षाच्या नेमणुकीनंतर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारी 2019 पासून मुंबईत सुरू होईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. 19 नोव्हेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला मुंबईत सुरुवात झाली होती. 55 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

अधिवेशनाच्या दोन आठवड्यांच्या कामकाजात केवळ आठ दिवस कामकाज झाले. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले, तर दुष्काळाच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत वादळी चर्चा झाली. मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीने अधिवेशन गाजले. विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे विजय औटी बिनविरोध निवडून आले. या अधिवेशनात अठरा विधेयके मंजूर झाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या विधानसभेचे कामकाज राष्ट्रगीतानंतर संस्थगित झाले.