ग्रॅण्ट रोडमध्ये फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेचा डी विभाग ग्रॅण्ट रोड परिसरात बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोसावी तसेच तानाजी मोरे, निरीक्षक भय्यासाहेब पारधी, अमोल महाजन, जगदीश झोरे आणि रतीलाल झोरे यांच्यासह 24 पालिका कामगारांकडून ही कारवाई करण्यात आली.

डी विभागातील दवाबाजार परिसरात घाऊक मार्केट, अनेक आस्थापनांची कार्यालये असल्याने कायम रहदारीचा भाग म्हणून परिचित आहे. मात्र या परिसरात वाढत्या बेकायदेशीर फेरीवाल्यांमुळे रहिवाशांसह पादचाऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागतो.