…तर मुरली विजयच्या कारकीर्दीला लागणार कायमचा ब्रेक, पाहा आकडेवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडिया आणि इंग्लंड संघात 30 ऑगस्टपासून साऊथहॅप्टन येथे चौथ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. तिसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली. एकीकडे पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीसाठी कसोटी संघाचे दरवाजे उघडण्य़ात आले आहेत, तर सलामीवर मुरली विजय आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कुलदीप यादव सध्या फक्त 23 वर्षाच्या असल्याने भविष्यात त्याला अधिक संधी मिळतील, परंतू 34 वर्षीय मुरली विजयपुढील आव्हानं वाढणार आहेत.

टी-20 मध्ये इरफानने रचला इतिहास, 4 षटकात एक धाव दोन बळी

मुरली विजयने आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अनेकवेळा त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. काहीवेळा संघात स्थान मिळून देखील फिटनेमुळे त्याला अनेक सामन्यांना मुकावे लागले. सध्या सलामीवीरच्या जागेसाठी अनेक खेळाडू रेसमध्ये आल्याने या 34 वर्षीय खेळाडूच्या कारकीर्दीवर टांगती तलवार आहे. शिखर धवन, के.एल. राहुल, पृथ्वी शॉ, रोहित शर्मा, हनुमा विहारी हे सलामीवीरच्या रेसमध्ये असल्याने मुरली विजयला किती संधी मिळते यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे.

आकडेवारी करू शकते घात
मुरली विजयने गेल्या काही वर्षात कसोटीमध्ये हिंदुस्थानला दमदार सलामी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजवाली आहे. परंतु 2018 मध्ये त्याच्या कामगिरीत घसरण सुरू झाल्याचे दिसत आहे. गेल्या 6 कसोटी सामन्यांची आकडेवारी पाहिली तर ती दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांचे संघात परतण्याचे मनसुबे ध्वस्त होताना दिसत आहेत.

पाहुया ही आकडेवारी –

जानेवारी 2018 (केपटाऊन) – आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 13 धावा

जानेवारी 2018 (सेंच्यूरियन) – आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पहिल्या डावात 46 आणि दुसऱ्या डावात 9 धावा

जानेवारी 2018 (ज्योहान्सबर्ग) – आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पहिल्या डावात 8 आणि दुसऱ्या डावात 25 धावा

जून 2018 (बंगळुरू) – अफगानिस्तानविरुद्ध कसोटीत पहिल्या डावात 105 धावा

ऑगस्ट – 2018 (बर्मिंघन) – इंग्लंडविरुद्ध कसोटीत पहिल्या डावात 20 आणि दुसऱ्या डावात 6 धावा

ऑगस्ट 2018 (लॉर्डस) – इंग्लंडविरुद्ध कसोटीत दोन्ही डावात शून्य धावा

विजयने गेल्या 6 कसोटीत फक्त 233 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा समावेश आहे आणि ते देखील अफगानिस्तानसारख्या नवख्या संघाविरुद्ध आणि तेही स्वदेशात.

विजयने आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळले असून यात 101 डावात फलंदाजी करताना 39.33 च्या सरासरीने 3933 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 12 शतकांचा आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.