उधारीच्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पानपट्टीच्या उधारीवरून झालेल्या वादातून मित्रांनीच धारदार शस्त्र्ाने वार केल्यानंतर सिमेंटच्या पाईपचा तुकडा डोक्यात घालून मित्राचा खून केला आहे. करवीर तालुक्यातील उचगाव येथे कृषी महाविद्यालयाच्या परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, गांधीनगर पोलिसांनी अवघ्या पाच तासांतच या खुनाचा छडा लावला असून, पाचजणांना ताब्यात घेतले आहे.

गणेश नामदेव संकपाळ (वय 40, रा. गणेश कॉलनी, उचगाव) असे मृताचे नाव आहे.

गणेश संकपाळ व त्याचे मित्रांमध्ये रात्री कृषी महाविद्यालयाच्या आवारात पानपट्टीच्या दोनशे रुपयांच्या उधारीवरून वाद झाला. वादाचे पर्यवसान खुनात झाले. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, मोहन गवळी, बजरंग हेब्बाळकर, आकाश पाटील, राजू नाईक, विराज डांगे, सुदर्शनी व गांधीनगर पोलीस यांनी अवघ्या काही तासांत याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले.