तबला वादन स्पर्धेत सातारचा ओम जाधव तर सुगम गीतगायन स्पर्धेत कर्‍हाडची श्रेया भांबुरे प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

कराड जिमखान्याच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय तबला वादन व सुगम संगीत गीत गायन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये सातारा, कोरेगाव, पाटण, मसुर आदी ठिकाणच्या शालेय विद्यार्थ्यांचा सहभागी होता.

अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळ्यात कराड मधील पुढारीचे सतिश मोरे, अमोल चव्हाण, सकाळचे सचिन शिंदे, सचिन देशमुख, सामनाचे गोरख तावरे, तरुण भारतचे देवदास मुळे, लोकमतचे प्रमोद सुकरे, प्रीतिसंगमचे शशिकांत पाटील, चंद्रजित पाटील, अशोक मोहने तसेच विविध वृत्तपञांचे व चॅनेलच्या प्रतिनिधींचा पञकार दिनानिमित्ताने संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी जन.सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी सर्वांचे स्वागत करुन कराड जिमखान्याच्या प्रदिर्घ सांस्कृतिक व सामाजिक वाटचालीत विविध वृत्तपञे व चॅनेलच्या प्रतिनिधींनी केलेल्या निरपेक्ष सहकार्यामुळेच संस्थेचे विविध उपक्रम समाजापर्यंत पोहोचल्याचे विषद केले. अध्यक्ष महेंद्रकुमार शाह यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीत प्रसार माध्यमांचे असेच सहकार्य लाभावे ही अपेक्षा व्यक्त केली.तर पुढारीचे सतिश मोरे व सकाळचे सचिन शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना शालेय स्तरावर अनेक उपक्रम सातत्याने राबविणार्‍या जिमखान्याने साहित्य संमेलन, प्रीतिसंगम संगीत महोत्सव, पक्षीमिञ संमेलन, लोककला संमेलन व रणजी सामन्यांसारख्या मोठ्या उपक्रमांचे नेटके आयोजन करुन कर्‍हाडच्या सांस्कृतिक क्षेञाचा राज्यात लौकिक वाढविला असल्याचे सांगितले.

स्पर्धेतील विजेते
तबला वादन: लहान गट प्रथम- रुजुल दडगे, व्दितीय- अनिकेत सवदीकर, तृतीय-जय कुलकर्णी, मोठा गट: प्रथम ओम जाधव, व्दितीय- अभिजित तडाखे, तृतीय- मिहीर तळवलकर, गीत गायन: लहान गट प्रथम- अस्मिता पावनगडकर, व्दितीय- वेदा रसाळ, तृतीय- रेवा कुलकर्णी, मोठा गट प्रथम- श्रेया भांबुरे, व्दितीय- प्रिया कुलकर्णी, तृतीय-मिताली जाधव

तबला वादन स्पर्धेसाठी नितिन पंडीत, पुसेगाव व निलेश कुलकर्णी, पुणे यांनी तर गीत गायन स्पर्धेसाठी कु. मधुरा व भैरवी किरपेकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपञ देवून स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले.

प्रमोद गरगटे, दिलिप आगाशे, दिपक शहा, श्रीकांत इनामदार, नंदा जोशी, शंकरराव चव्हाण, विवेक कुंभार या सभासदांमुळे स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाल्या.