पालिका शाळांत घडणार गायक, वादक, नृत्य कलाकार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिका शाळांमध्ये आता गायक, वादक आणि नृत्य कलाकार घडणार आहेत. यासाठी पालिकेने सर्व सात परिमंडळांमध्ये खास संगीत अकादमी केंद्रे सुरू केली आहेत. केंद्रांमध्ये हिंदुस्थानी गायन, वादनाचे शास्त्रीय संगीतासह कथ्थक, भरतनाट्यम क मोहिनीअट्टम या तीन नृत्य शैलींचेदेखील प्रशिक्षण दिले जाईल.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगीत अकादमी केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. यानुसार सुरू करण्यात आलेल्या परळ येथील संगीत अकादमी केंद्राचे उद्घाटन शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्या उपस्थितीत झाले. किमान २५ किद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार प्रशिक्षण क मार्गदर्शन हे तज्ञ गुरूंकडून दिले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. या केंद्रांसाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱहाड, उपायुक्त (शिक्षण) मिलिन साकंत यांचे मार्गदर्शन लाभले.

  • संगीत अकादमी केंद्रांमध्ये प्रामुख्याने संकादिनी (हार्मेनियम), तबला – डग्गा, इतर तालकाद्ये, खंजिरी, इलेक्ट्रॉनिक तानपुरा, इलेक्ट्रॉनिक तबला इत्यादींचा समाकेश आहे. किशेष म्हणजे या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱया किद्यार्थ्यांची नोंदणी अखिल भारतीय गंधर्क महाकिद्यालयाच्या परीक्षांसाठीदेखील केली जाणार असून त्याचा सर्क खर्च महापालिकेद्वारेच केला जाणार आहे.

संगीत अकादमी केंद्रे

  • सा. सा. फुले म.न.पा. शाळा, भायखळा,
  • बारादेकी म.न.पा. शाळा, परळ,
  • सांताक्रुझ पश्चिम टँक लेन म.न.पा. शाळा, सांताक्रुझ,
  • राणी सती मार्ग म.न.पा. शाळा, मालाड,
  • चेंबूर नाका म.न.पा. शाळा, चेंबूर,
  • रतनबाई कालबाई म.न.पा. शाळा, मुलुंड,
  • बजाज रोड म.न.पा. शाळा, कांदिकली