मुस्लिम टोळक्याने केला हिंदुंच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला

29

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मागील भांडणाच्या कारणावरून मुस्लिम टोळक्याने हिंदूच्या घरात घुसून लाठ्या-काठ्या आणि गजाने प्राणघातक हल्ला चढवला. यात दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात चार मुस्लिम तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सूल-जटवाडा रोड, ओव्हरगावमधील पंडित महादुराव नलावडे यांचे घराशेजारी राहणारे फारुक पटेल यांच्यासोबत अनेक दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहे. या वादातून त्यांचे भांडणही झाले होते. पंडित नलावडे हा बुधवारी दुपारी १२ वाजता घरात असताना फारुख पटेल व त्याचे साथीदार युसूफ, अफरोज ऊर्फ डागऱ्या आणि याकुब यांनी मागील भांडणाच्या कारणावरून घरात घुसून पंडित नलावडे यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि गजाने प्राणघातक हल्ला चढवला. यात पंडितसह त्यांचा चुलत भाऊ मच्छिंद्र नलावडे हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत दोघांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते.

सिद्धनाथ वडगावमधील जीवन एकनाथ दिवेकर यांच्या घरात घुसून सतीश सोनवणे, जितेश सरोदे, दिलीप कासार, आकाश पानगे व त्यांच्यासोबत असलेल्या चार जणांनी दिवेकर यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. तसेच नारळीबागेतील शिवदास नारे यास संभाजीपेठेतील पिनॅकल अ‍ॅकॅडमीत ट्यूशनचे जास्तीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दिगंबर वैद्य याने बेदम मारहाण करीत दांड्याने मारून हात फ्रॅक्चर केला. शहानूरवाडीतील सलमान पठाण इस्माईल पठाण तडवी यास मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पैसे देण्याचा कारणावरून कैलासनगरातील शेख अल्ताफ, शेख फय्याज, शेख अफरोज आणि शेख इम्रान यांनी कैलासनगरात बोलावून बेदम मारहाण करीत चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या