
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी शहरातील दोन अल्पवयीन हिंदु मुलींची मुस्लीम मवाल्याच्या तावडीतून नांदेड येथे जाऊन जिगरबाज निष्ठावंत शिवसैनिक बाळु पारवे यांनी सुटका केली. यामुळे पित्त खवळलेल्या धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने पारवे यांच्या इंदीरानगरातील भागातील घरावर तुफान दगडफेक करून हैदोस घातला. यानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून मुस्लिमांना मोकळे रान सोडणाऱ्या पोलिसांनी धर्मांधासमोर शेपुट घालत पारवे यांना गजाआड केले.
कळमनुरी नगर परिषदेच्या शिवसेनेच्या नगरसेवीका पार्वताबाई पारवे यांचे सुपूत्र बाळू पारवे हे नेहमीच हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी उभे राहतात. कळमनुरी शहरातील दोन अल्पवयीन हिंदू मुलींना मुस्लीम युवकांनी 18 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे पळवुन नेल्याची माहिती पीडित मुलींच्या आई वडिलांनी पारवे यांना दिली. त्यानंतर बाळू पारवे हे शिवसैनिकांसह नांदेड येथे गेले व त्यांनी या युवकांचा माग काढत त्यांच्या तावडीतून मुलींची सुटका करून कळमनुरीमध्ये सुखरूप आई वडिलांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, ही माहिती समजताच 100 ते 200 मुस्लिमांच्या जमावाने हैदोस घालत बाळू पारवे यांच्या इंदिरानगर मधील घरावर रात्रीच्या सुमारास तुफान दगडफेक केली. त्यावेळी पारवे घरात गेल्यामुळे बालंबाल बचावले तर त्यांच्या सोबत असलेल्या विशाल पवार या शिवसैनिकांच्या डोक्यात दगड घालुन मुस्लिमांनी गंभीर जखमी केले. या संबंधीची फिर्याद बाळु पारवे यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून शेख आरेफ शेख खलील, शेख जम्मु शेख खलील, शेख शकील शेख खलील व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तर बाळु पारवे यांच्यासह सहा जणांविरुद्ध जीवे मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमान्वये शेख आरेफच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. मुस्लिमांच्या समोर नांगी टाकणाऱ्या पोलिसांनी सोमवारी पहाटे चार वाजता पारवे यांना अटक केली. धर्मांध मुस्लिमांवर किरकोळ गुन्ह्याची कलमे लावल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
दरम्यान, डिवायएसपी व अन्य पोलीस अधिकाऱ्यानी कळमनुरीला भेट दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, शहरप्रमुख संतोष सारडा, सुहास पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या घटनेचा निषेध केला. या प्रकरणाची सविस्तर माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना देऊन पोलिसांच्या दडपशाहीचा वृत्तांत सांगणार असल्याचेही शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.


























































