
बिहारमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. हर्नियावर उपचारासाठी खासगी रूग्णालयात गेला असता शस्त्रक्रियेच्या नावाखाली डॉक्टरांनी त्याचे गुप्तांग कापल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कमलेश महतो असे पिडीत रूग्णाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी संगीता देवींनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये लिहीलेय की, कमलेश यांना बळजबरी रूग्णालात बोलावून शस्त्रक्रिया केली आणि चुकीची शस्त्रक्रिया करत त्याचे गुप्तांग कापण्यात आले. याप्रकरणी सिटी एसपी अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितले की, पिडीतेकडून सकरा ठाणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करुन याप्रकरणी कारवाई केली जाईल.
एआर श्रीवास्तव असे आरोपी डॉक्टरचे नाव असून शिव शक्ती नर्सिंग होममध्ये हा प्रकार घडला आहे. 10 एप्रिल रोजी सकरा वाजिद येथे राहणारे कमलेश महतो यांचे हर्नियाची शस्त्रक्रिया केली होती.नर्सिंग होममध्े हर्नियावर उपचार झाला नाही, उलत त्याच्यात श्रीवास्तव यांचे गुप्तांग कापण्यात आले. त्यामुळे रूग्णाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे डॉक्टर एआर श्रीवास्तवसह संचालक ब्रिज बिहारी चौधरी आणि नर्स सविता ठाकुरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































