नगर – आणखी 11 व्यक्तींचा ‘कोरोना संसर्ग’ अहवाल निगेटीव्ह

नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे गुरुवारी रात्री पाठविलेल्या 11 स्त्राव नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटीव आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान आता आणखी 07 स्त्राव नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असून यात सर्वप्रथम बाधित झालेल्या रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल शुक्रवारी उशीरापर्यंत येण्याची अपेक्षा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या