
स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी 19 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचा परिणाम आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांवरही झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात केल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सर्वेच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात 12 जुलै रोजी सुनावणी झाली. ओबीसी आरक्षणासंदर्भात समर्पित आयोगाने दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वेच्च न्यायालयात सादर करण्यात आला; तसेच 19 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी आता आचारसंहिता लागू राहणार नाही. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
महाविकास आघाडीचे निर्णय बदलण्याचा नव्या सरकारचा एककलमी कार्यक्रम
नगराध्यक्ष-सरपंचाची थेट निवडणूक
आणीबाणीतील बंदिवानांना पुन्हा पेन्शन






























































