नमस्ते इंग्लडच्या ट्रेलरलाच प्रेक्षकांच्या शिव्या

2

सामना ऑनलाईन । मुंबई

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर नमस्ते लंडन हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर दिग्दर्शक विपुल शहा यांनी अर्जून कपूर आणि परिनीती चोप्रा यांना घेऊन नमस्ते इंलंड हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहताच क्षणी प्रेक्षकांनी हा चित्रपट फाल्तू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

screen-shot

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक नववनीन प्रयोग होत आहे. अक्षय कुमार, राजकुमार राव, आमीर खान यांनी बॉलिवूडला लव्ह स्टोरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण हा चित्रपट म्हणजे बॉलिवूडला जुन्या काळातच नेणारा आहे अशी टीका काही जणांनी केली आहे. तसेच परिणीती चोप्रा आणि अर्जून कपूर यांना अभिनय जमत नाही अशीही टिप्पणी काही प्रेक्षकांनी केली आहे. अर्जून कपूर आयुष्यात कुठलाच चांगला चित्रपट करू शकत नाही आणि जो त्याच्याबरोबर काम करेल तो ही कामातून जाईल असे म्हणत प्रेक्षकांनी अर्जून कपूरला ट्रोल केले आहे. यांना चित्रपट देतो कोण असा सवालाही एका प्रेक्षकाने इथे उपस्थित केला आहे. तर या चित्रपटात आम्ही अक्षय कुमारला मिस करत असून  त्याशिवाय या चित्रपटात मजा नाही असे म्हटले आहे.