कोरोना लढाईत भाजपची लसीच्या नफेखोरीला साथ; नाना पटोले यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपचे नेते हीन राजकारण करत आहेत.  भाजप हा  कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहे असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.

देशातील भाजपशासित राज्यांपेक्षा महाराष्ट्र कोरोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारला वारंवार कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सावध करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक सूचना केल्या. पण त्यावर अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्रातील मंत्री व भाजप नेते त्यांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानत होते. काँग्रेस नेत्यांचे सल्ले वेळीच ऐककले असते तर आज देशात ही नक्कीच झाली नसती.

नक्की कोणाचे सेवक

एकाच लसीच्या अशा तीन वेगवेगळ्या दरांना मान्यता देऊन केंद्र सरकार नफेखोरीला प्रोत्साहन देत आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी आवाज उठलला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिरच्या का झोंबल्या? पाटील पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे, असा टोला नाना पटोले यांनी मारला.