सोमय्यांविरोधात कारवाई झाल्यास तो बदला म्हणता येणार नाही – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनतेकडून पैसे गोळा करणं, त्याची लूट करणं, अशी मानसिकता असेल आणि ते रेकॉर्डवर आहे. त्यामुळे रेकॉर्डशिवाय आम्ही काही करत नाही, कारण आम्हालाही त्यांच्यासारखं करता आलं असतं पण आम्हाला असा विद्ध्वंस करायचा नाही. जो कुणी चुकी करत असेल म्हणून त्याच्यावर कारवाई केली तर तो काही बदला नाही. ती वास्तविकता आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी किरीट सोमय्यांवर कारवाई झाल्यास तो बदला नसेल असे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासंदर्भात त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले. केंद्राच्या अत्याचाराची व्यवस्थेची जाणिव करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. निरपराध लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून ब्लॅकमेलींग करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपने सुरू केला आहे ते पंतप्रधानांना सांगण्यासाठी ते गेले होते. त्याचं त्यांनी उत्तरही दिलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाणाचा प्रश्न नाही. केंद्राच्या जुलमी आणि अघोषित आणीबाणीच्या बाबतीत सांगण्यासाठी ते गेले होते, असे नाना पटोले यांनी सांगितले.

‘हे जनतेच्या आशीर्वादाचं सरकार आहे. हे सरकार लोकोपयोगी काम करत आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद या सरकारला आहे. कितीही त्यांनी या केंद्रीय तपास यंत्रणेचा दूरुपयोग करून राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी ते पडू शकणार नाही’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.