नांदेड – आज 245 कोरोना रूग्णांची नोंद, बाधितांचा आकडा 14 हजार पार

कोरोना विषाणू संसर्गामुळे आज पाच जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३७१ एवढी झाली आहे. आज २४५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १४२०० एवढी झाली आहे.

आज टॉऊन मार्केट सोसायटी नांदेड येथील ७८ वर्षीय महिला, बिलोली येथील ४५ वर्षीय पुरुष, सहयोगनगर नांदेड येथील ७८ वर्षीय पुरुष, कुरुळा ता. कंधार येथील ७२ वर्षीय पुरुष, बाफना रोड नांदेड येथील ६० वर्षीय महिला अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

आज १०२३ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ७४२ जणांचे रिपोट निगेटीव्ह आले आहेत तर आज २४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळले असून त्यामुळे एवूâण रुग्णसंख्या १४२०० वर पोहंचली आहे.

आज नांदेड महापालिका क्षेत्रात १०५, कंधार २, माहूर १, हदगाव ७, भोकर २, बिलोली ७, देगलूर १, परभणी १, नांदेड ग्रामीण १८, मुखेड ३, नायगाव २१, लोहा ७, वाशिम १, यवतमाळ २, हिंगोली २, मुदखेड ४, उमरी २, किनवट ८, हिमायतनगर १, बीदर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज २०५ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे वाटू लागल्याने सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उपचार घेवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १०१८३ एवढी झाली आहे. आता वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून ३५७७ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी ४८ जणांची प्रकृती गंभीर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या