संतापजनक! राणेंची छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी तुलना!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वरात अटक झाल्यानंतर भाजपचे सिंधुदुर्ग माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केली. जठार यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय व छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे असल्याची तक्रार शिवसेना आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.

नारायण राणे यांना अटक झाल्यावर ‘छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले होते, असे वक्तव्य प्रमोद जठार यांनी केले आहे. राणे हे अनेक फौजदारी गुह्यांत आरोपी असताना त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी करणे हे निंदनीय कृत्य आहे. जठार यांनी हेतुतः आणि जाणीवपूर्वक असे करून छत्रपती संभाजी महाराजांचे अनुयायी व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार राजन साळवी यांनी संगमेश्वर व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तर वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत चिथावणीखोर वक्तव्याबद्दल जठार यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.