बचावकार्याच्या नादात मंत्री स्वत:च पुरात अडकले, काहींनी केले कौतुक तर काहींनी केली टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशाच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दतिया जिल्ह्यात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी गृहमंत्री डॉ.नरोत्तम मिश्रा हे धावून गेले होते. NDRF च्या बोटीत बसून मिश्रा हे पुरामुळे बाधित गावांकडे जात होते. या गावात काही लोकं घराच्या छतावर बसनू होते. त्यांच्या सुटकेसाठी जात असताना मिश्रा ज्या बोटीत बसले होते, त्या बोटीवरएक झाड पडलं ज्यामुळे स्वत: मिश्रा हेच संकटात सापडले होते.

नौदलाने घराच्या छतावर अडकलेल्या लोकांची सुटका केली त्यानंतर मिश्रा यांचीही सुटका केली. मिश्रा यांना वाचवत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून निरनिराळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही विरोधकांनी मिश्रा यांचे कौतुक केले आहे तर काही विरोधकांनी मिश्रा यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी म्हटलंय की ‘जर चुकांसाठी धारेवर धरणं हा विरोधी पक्षांचा धर्म असेल तर चांगल्या गोष्टीचं कौतुकही होणं गरजेचं आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या धाडसाला सलाम.’

समाजवादी पक्षाचे नेते यश भारतीय यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ‘हा व्हिडीओ काय उत्तम पद्धतीने बनवण्यात आला आहे, असं वाटतंय की वीर झारा चित्रपटात शाहरूख खान प्रीती झिंटाला वाचवतोय. कहानी फिल्मी है.’ नवभारत टाईम्स या वर्तमानपत्रात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.